Dehugaon: 101 जणांनी केले रक्तदान

Dehugaon: 101 people donated blood भोसरी येथील संजीवनी ब्लड बँकेने रक्त संकलन केले.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले.

या शिबिरास मावळचे आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, युवा अध्यक्ष योगेश मोरे, महिला अध्यक्ष वैशाली टिळेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती, विद्यमान सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच राणी मुसुडगे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष वनिता देशकर, जिल्हाध्यक्षा अर्चना शहा, रुपाली दाभाडे, स्मिता काळे, दीपाली पिंजण, देहू ट्रेकर्स व दिल दोस्ती ग्रुपचे सर्व सभासद उपस्थित होते.

यामध्ये अमित घेनंद, पूनम घेणंद, कुणाल रणपिसे, रणपिसे, त्याचप्रमाणे प्रकाश हगवणे यांनी सहकुटुंब रक्तदान केले. भोसरी येथील संजीवनी ब्लड बँकेने रक्त संकलन केले.

याप्रसंगी कोरोना योद्धा म्हणून काम करणारे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, तलाठी गिते भाऊसाहेब, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, सरपंच पूनम काळोखे यांचा सन्मान करण्यात आला. शेखर परंडवाल यांनी सूत्रसंचालन तर सोमनाथ चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.