Dehugaon : संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथासाठी १४ बैलजोड्या मालकांचे अर्ज

एमपीसी न्यूज – जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३४ व्या पालकी सोहळ्यात पालखी रख ओढण्याचा मान मिळावा, म्हणून आज अखेर १४, तर चोघड्यांची गाडी ओढण्याचा मान मिळावा, म्हणून तीन बैलजोडी मालकांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी संस्थानकडे अर्ज दाखल केले आहेत. संस्थानच्या निवड समिती व विश्वस्त मंडळाकडून या बैलांची लवकरच पाहणी करुन यंदाचा पालखी रथ ओढण्याचा बैलजोडी मालक मानकरी निश्चित केला जाणार आहे.

पालखीचा रथ ओढण्चाया मान मिळावा, म्हणून बाणेर (पुणे) येथील बाबुराव चिंधु विधाटे, आंबेगाव बु. (ता. हवेली) येथील रवींद्र बाळासाहेब कोंढरे, चिखली टाळगाव ता. हवेली. येथील गणेश नारायण भुजबळ, नवलाख उंब्रे (ता. मावळ), येथील दत्तात्रय धोंडिबा बदाले, भुकुम (ता. मुळशी) येथील तुकाराम लक्ष्मण हगवणे हिंजवडी (ता. मुळशी) येथील बाळकृष्ण बबन साखरे, च-होली (ता. हवेली) येथील गणेश आनंदा थोरवे, लोहगाव (ता. हवेली) येथील सुरज ज्ञानेश्वर खांदवे, वाकड (ता. हवेली) येथील ज्ञानेश्वर उध्दव शेडगे व तुकाराम शेडगे, नांदेडगाव (ता. हवेली), निखिल सुरेश कोरडे आव्हाळवाडी, वाघोली येथील नारायण गुलाबराव आव्हाळे , देहुगाव विठ्ठलनगर (ता. हवेली) येथील ज्ञानेश्वर सयाजी काळोखे वाल्हेकरवाडी चिंचवड येथील प्रदीप पोपट वाल्हेकर, कैलास तुकाराम सातव वाघोली (ता. हवेली) यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

  • चौघड्याची गाडी ओढण्याचा मान मिळावा म्हणून येलवाडी (ता. खेड) येथील राजाराम भिकाजी गाडे, सांगुर्डी (ता. खेड) अर्जुन किसनराव काळे आणि लोणीकाळभोर (ता. हवेली) येथील सूर्यकांत सुभाष काळभोर यांनी अर्ज केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.