Dehugaon : अभंग स्कुलची मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत

एमपीसी न्यूज :  ‘देहू – तुका म्हणे सत्य l कर्मा व्हावे सहाय्य…’ संत तुकाराम  महाराजांच्या या अभंग वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाऊंडेशन संचालित  अभंग इंग्लिश मीडियम  स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापिका व संस्था चालक यांच्यावतीने कोरोनाच्या लढ्यासाठी   मुख्यमंत्री सहाय्यता निधीला  51,000 रुपयांची मदत करण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

ही रक्कम  एनईएफटी  (UTR No.000175835724) द्वारे आज देण्यात आली.  सध्या महाराष्ट्रात  कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशा  संकट काळात अभंग इंग्लिश मीडियमच्या  वतीने  मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून मानवतेचे उदात्त दर्शन घडविले.

सधन पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या नावाने शक्य असेल तेवढी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करून या लहान वयातच परोपकराचे संस्कार मुलांच्या मनावर रुजवावेत, असे आवाहन  शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर व संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद यांनी पालकांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.