Dehugaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुलगा त्याच्या आई वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे शेजारी राहणारी महिला हे भांडण सोडवण्यासाठी गेली. त्यावेळी मारहाण करणाऱ्या मुलाने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे वडाचा माळ, देहूगाव येथे घडले आहे.

नैना सोपान पांडे (वय 48, रा. वडाचा माळ, गाथा मंदिराच्या मागे, संत सेना महाराज नगर, देहुगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आरोपी अक्षय हा त्याच्या आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे फिर्यादी ते भांडण सोडवण्यासाठी गेल्या. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या पोटात लाथ मारली. यामुळे फिर्यादी यांना पोटदुखीचा त्रास झाला.

तसेच अन्य व्याधी होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. आरोपी अक्षय याने फिर्यादी यांचा मुलगा प्रजोत याला देखील मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.