Dehugaon: आरोग्य केंद्रात फुलणार ‘आयुर्वेदीक’ औषधांची आरोग्य बाग

एमपीसी न्यूज – विविध समाजउपयोगी कार्यक्रम राबविणारे देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांच्या संकल्पनेतून आरोग्य केंद्रात ‘आयुर्वेदीक’ औषधांची आरोग्य बाग फुलणार आहे. केंद्राच्या आवारात ‘आयुर्वेदीक औषधांची आरोग्य बाग’ निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या प्राचार्या रागिणी पाटील आणि मीनल लाड यांच्या सहकार्यातून शेकडो औषधी वनस्पतींची रोपे, बिया मिळाल्या आहेत. यामध्ये कोरफड, अमलतास, पांढरा चाफा, गुलाब, मोगरा, कडीपत्ता, चिंच आदी झाडांचाही समावेश आहे. या उपक्रमासाठी देहूतील कर्तव्य फाऊंडेशन, आरोग्यक्रांती प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले रुग्णालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत खड्डे खणून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यातूनच आयुर्वेदीक औषधांची ‘आरोग्य बाग’ निर्माण करण्याची संकल्पना समोर आली. त्यानुसार कोरफड, अमलतास, पांढरा चाफा, गुलाब, मोगरा, कडीपत्ता, चिंच आदी रोपे आणि बिया लावण्यात आल्या आहेत. त्याची व्यवस्थित निगा राखून ती झाडे जगविली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.