Dehugaon Crime : पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पती गजाआड

एमपीसी न्यूज – पतीने चारित्र्याच्या (Dehugaon Crime) संशयावरून पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा चक्क मृत्यू झाला आहे. ही घटना देहुगाव येथे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

यातील आरोपी पती सोहन प्रभाकर साठे (वय 45 रा.देहुगाव) याला देहुरोड पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

Sutarwadi : कोयत्याचा धाक दाखवून तरुणास लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रंजिता सोहन साठे (वय 39) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपीने केवळ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला घरासमोरील रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा चक्क मृत्यू झाला. यावेळी भर रस्त्यात मारहाण होत असताना कोणीही आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. या मारहाणीतच पत्नीचा मृत्यू झाला. देहुरोड (Dehugaon Crime) पोलिसांनी पतीला बेड्या ठेकल्या असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.