Dehugaon : देहुमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग

शिळा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रशासकीय कामे व अंतर्गत कामाची लगबग सुरू झाली आहे श्री संत तुकाराम महाराज संस्था शासकीय दिंडी चालक व वारकऱ्यांचा पत्र व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिरातील अंतर्गत कामाची लगबग सुरू आहे.

देऊळवाड्यात एशिया मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यासाठी अजून किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. मंदिर परिसरातील दोन्ही नांदुरकीवृक्षाच्या दुरुस्ती व देखभालीचे काम सुरु आहे. या ठिकाणाच्या दरजा भरुन त्याला ग्राऊंटिंग करण्यात येत आहे.

मंदिर परिसराची साफसफाईची कामे सुरू आहेत पालखीच्या दुरुस्ती देखभालीसाठी खडकी येथील 512 दारूगोळा कारखान्यात पाठविण्यात आला आहे. यंदा पालखी सोहळ्यात देहूगाव ते निगडी या मार्गावर उपलब्धतेनुसार झाडे लावण्यात येणार असून पर्यावरण पूरक 50 लाख पत्रावळ्याचे शासनामार्फत वाटप करण्यात येणार आहे या सोहळ्यात पुणे-सोलापुर आणखीन तीन विद्यापीठे सहभागी होणार असल्याची माहिती विश्वस्त अजित मोरे यांनी दिली .

काही ठिकाणी निसटलेले जुने दगड व्यवस्थित यंत्राच्या साह्याने कापून सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे मंदिराच्या उभारायचे भजनी मंडळाची कामे पूर्ण झाली असली तरी भजनी मंडळातील कमानीचा रंग काढण्याचे काम बाकी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेली चौघडा घराचे कामही वेगाने सुरू असून पालखी सोहळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वस्त अजित मोरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.