Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहूत बीज सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 376 वा बीज सोहळा (Dehugaon) आज (बुधवारी) मोठ्या आंनदात देहूमध्ये पार पडला. तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते.

यंदाचे बीज सोहळ्याचे 376 वर्षे आहे. या निमित्ताने देहू नगरीत लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.

LokSabha Elections 2024 : महायुतीची फौज उतरणार प्रचारात, 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध

सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान (Dehugaon) झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.