BNR-HDR-TOP-Mobile

Dehugaon : डॉ. किशोर यादव यांना वैद्यकीय पुरस्कार जाहीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. किशोर मधुकर यादव यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘वैद्यकीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

देहूरोड येथील सुभाष चौकात उद्या (शनिवार) सायंकाळी पाच वाजता पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान सन्मान जनसभेचे आयोजन केले आहे. यावेळी डॉ. यादव यांच्यासह विविध मान्यवरांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पंढऱीनाथ आव्हाड, संभाजी गायकवाड, प्रकाश भालेराव, रामदास ताटे, अमिन शेख, पार्टीचे देहूरोड शहराध्यक्ष परशुराम दोडमणी उपस्थित राहणार आहेत.

तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बापूसाहेब गायकवाड, परवेश ऊर्फ सोनू नबी शेख, बशिर शेख, शैक्षणिक क्षेत्रातील बाळासाहेब धावारे यांना तर अनिल व्यवहारे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजनात कय्युम शेख, अरूण जगताप, किरण भोंबक, नसिर शेख यांनी पुढाकार घेतला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.