Dehugaon: अभंग-प्रतिष्ठानतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना ‘फेसशील्ड’चे मोफत वाटप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिवावर उदार होऊन डॉक्टर कोरोनाविरूध्द लढा देत आहे. डॉक्टरांच्या लढ्याला  हातभार लावण्यासाठी देहूगावातील अभंग-प्रतिष्ठानतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह इतर कर्मचार्‍यांना 50 फेसशील्डचे मोफत वाटप  करण्यात आले. 

याप्रसंगी अभंग-प्रतिष्ठानचे पदाधिकारी  प्रा. विकास कंद, सागर मोरे, चंदन सुतार, दिनेश कुंभार, ग्रा.प. सदस्य सचिन कुंभार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे डॉक्टर, आशा कार्यकर्ती, आरोग्यसेवक, सेविका यांच्यासाठी अभंग-प्रतिष्ठानतर्फे 15 हजार रूपयांचे 50 फेसशील्ड मोफत वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.