Dehugaon : संत तुकाराम अन्नदान मंडळातर्फे देहू प्राथमिक आरोग्य केंद्राला लाखाचे वैद्यकीय साहित्य भेट

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहू प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी संत तुकाराम अन्नदान मंडळ यांच्या वतीने एक लाखाचे वैद्यकीय साहित्य भेट दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्र देहू येथे संत तुकाराम अन्नदान मंडळ यांच्या सर्व सदस्यांनी भेट दिली. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोनच्या लढाईमध्ये सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. देहुगावची सध्याची लोकसंख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. देहू प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज साधारण दोनशे ते अडीचशे रूग्णांची दररोज तपासणी, उपचार केले जातात.

मात्र, केंद्रात वीज पुरवठा खंडित झाल्यास अनेक अडचणी येतात. नियमित लसी साठवण्याच्या आयएलआर, डिप फ्रीझर यांना नियमित वीजपुरवठा होत नसल्याची अडचण डाॅ. किशोर यादव यांनी सांगितली. त्यावर मंडळाने तात्काळ १ लाख रुपयांची तरतूद करून लुमिनिअस या कंपनीच्या ६ बॅटरी सहित 5.2 केव्ही क्षमता असणारा इन्व्हर्टरचा संपूर्ण संच भेट दिला. सोबतच 10 लिटर सॅनिटायझर r आणि २ इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनही भेट दिले.

या साहित्यामुळे रूग्णसेवेतील अनेक प्रकारच्या अडचणींवर मात होण्यास मदत होईल, असा विश्वास डाॅ. किशोर यादव यांनी व्यक्त केला. तसेच या मदती बद्दल त्यांनी संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.