Dehugaon: मित्राला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 8 तोळ्याची सोन्याची चेन, अंगठी लांबवली

Dehugaon: gold chain, ring looted and threatening to kill friend and family या सोन्याच्या दागिन्यांची 2,60,000 एवढी किंमत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

एमपीसी न्यूज- मित्राला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 8 तोळ्याची चेन व अर्ध्या तोळ्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली आहे. ही घटना 28 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास देहूरोड येथील इंदोरी गावाजवळ घडली.

सनी शिंदे (रा. देहूगाव, ता. हवेली) व इतर अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी योगेश केशव पंचपिंड (वय 22, रा. देहूगाव, ता. हवेली) याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिकची माहिती अशी, आरोपी शिंदे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी योगेशच्या घरच्यांना व मित्राला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी योगेशच्या गळ्यातील 8 तोळ्याची सोन्याची चेन व अर्ध्या तोळ्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून काढली व चोरून नेली. या सोन्याच्या दागिन्यांची 2,60,000 एवढी किंमत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.