Dehugaon : इंद्रायणी नदी किनारी सापडले अर्भक?

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या किनारी अर्भक सापडले आहे. मात्र, हे अर्भक आहे की मांसाचा गोळा हे अद्याप समजू शकलेले नाही. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री उघडकीस आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावाजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर एक अर्भक सापडले असल्याची माहिती शनिवारी (दि. 30) रात्री देहूरोड पोलिसांना मिळाली. संशयित अर्भक नदीच्या किनारी असलेल्या गाळात अडकलेले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री त्या ठिकाणी देहूरोड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला.

रविवारी सकाळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे अर्भकच आहे की मांसाचा गोळा हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. जवळच नर्सिंग होम असल्याने अर्भक असण्याची शक्यता आहे. नायब तहसीलदारांना प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांच्या उपस्थितीत या प्रकरणाची शाहनिशा केली जाणार आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.