Dehugaon : इस्कॉनतर्फे 25 हजार वारकऱ्यांना महाप्रसाद

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्काॅन) रावेत आणि देहूगाव शाखेच्या वतीने यावर्षीही 25 हजार वारकरी भक्तांना संपूर्ण महाप्रसाद अन्नदान वितरण करण्यात आले. चिंचोलीगाव, देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

इस्काॅनकडून अन्नदान वितरणाचे हे 20 वे वर्ष आहे .प्रत्येक वर्षी भक्तांची संख्या वाढत आहे. संस्थेच्या वतीने देहूगाव येथे वर्षभरातील प्रत्येक एकादशी, द्वादशी, तुकाराम बीज, वसंत पंचमी व वर्षभरातील अनेक सणांना भाविकांना संपूर्ण महाप्रसाद अन्नदान वितरण केले जाते.

  • इस्काॅनच्या वतीने वर्षभरात जवळजवळ एक लाख भक्तांना अन्नदान वितरण केले जाते. इस्काॅनच्या अनेक उपक्रमांपैकी वारकरी भक्तांना इतर सुविधां सोबत अन्नदान वितरण करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

या अन्नदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेत अनेक महिला, लहान मुले यांनीही अन्नदान सेवेत भाग घेतला तसेच किन्हई व चिंचोली या गावातील सर्वच ग्रामस्थ भाविकांनी आणि इस्काॅनच्या अनेक भक्तांनी आपल्या घरातून भाकरी व चपाती बनवून दिल्या. इस्काॅनचे श्री गोपती दास महाराज, जगदीश गौरांग दास, अभिजीत कंद यांच्या वतीने अन्नदान सेवेत सहकार्य करणा-या सर्व भाविकांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.