Dehugaon: प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांचे आमदार सुनील शेळकेंकडून कौतुक

Dehugaon: MLA Sunil Shelke praises Corona Warriors at Primary Health Center लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनलॉक होईपर्यंत देहूमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण आढळला नव्हता.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस देहूगाव आणि दिलदोस्ती परिवारातर्फे देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव आणि कर्मचार्‍यांचा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आमदारांनी कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती, विद्यमान सदस्या हेमलता काळोखे, राष्ट्रवादीचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे, दिलदोस्ती परिवाराचे विशाल परदेशी, सोमनाथ चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनलॉक होईपर्यंत देहूमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण आढळला नव्हता. याचे सर्व श्रेय स्थानिक प्रशासन, जागरूक ग्रामस्थांसह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचार्‍यांना जाते.

मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत देहूतील काही भागात कोरोनाचे नऊ रूग्ण आढळले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. काळजी घ्यावी. मास्क वापरावा. वारंवार हात स्वच्छ धुवावेत.

कोरोनासदृश्य लक्षणे वाटल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. माहिती लपवून ठेवू नये, असे आवाहनही डॉ. यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.