Dehugaon News : देहू येथे शिवसेनेच्या शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन

एमपीसीन्यूज : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त देहूशहर शिवसेनेच्या वतीने आयोजित शिबिरात 65 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. सर्व रक्तदात्यांचे देहूशहर शिवसेनेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या वेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजयमहाराज मोरे, माजी विश्वस्त राजेंद्र मोरे, जालिंदरमहाराज काळोखे, संतोषमहाराज काळोखे, जेष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कंद, शिवसेना उप जिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा परिषद सदस्य व महिल आघाडी जिल्हा संघटिका शैला खंडागळे, मावळ तालुकाप्रमुख राजेंद्र खांडभोर, माजी हवेली तालुकाप्रमुख रमेश हगवणे, माऊली काळोखे, राजेंद्र ढमाले, तालुका समन्वयक रमेश जाधव, बाळासाहेब काळोखे, स्वप्नील काळोखे, मच्छिंद्र परंडवाल, सुनिलजी घोडेकर, राजेश शेलार, संदीप बालघरे, युवा सेना उप तालुका अधिकारी विशाल दांगट, प्रा. विकास कंद आदी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना देहूशहर प्रमुख सुनिल हगवणे, संजय आहेरकर, राजेंद्र काटे, युवासेना संघटक गणेश मोरे, संदीप हगवणे, महिला आघाडीच्या तालुका उपसंघटिका शुभांगी काळंगे, शहर संघटिका सुनंदा ढमाले, भाग्यश्री यादव, आशा आहेरकर, संगीता सोळंके, हेमलता गोडसे, उषा ढवळे, उर्मिला आहेरकर, शिवसेना विभाग प्रमुख सोमनाथ परंडवाल, गणेश काळोखे, शाखा प्रमुख चंद्रकांत जाधव, दत्तात्रय जाधव, गणेश हगवणे, नारायण काळोखे, मयूर देवकर, विजय हगवणे, दिपक नवले, अजय गुजर, महेंद्र टिळेकर, अक्षय धुमाळ, निलेश खांडेकर, सुभाष जाधव, अभिजित कंद, संतोष शिंदे, दत्तात्रय हगवणे, किशोर काळोखे, राहुल हगवणे, निखिल मराठे, विनोद हगवणे,संदीप टिळेकर, दिपक खेडकर, सुनिल जाधव, आदेश खंडांगळे यांनी परिश्रम घेतले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.