Dehugaon News : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये (Dehugaon News) 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे ध्वजावंदन समारंभ संत साहित्याचे अभ्यासक, अर्थतज्ञ, विचारवंत डॉ. अभय टिळक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सृजन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. कविता अय्यर, शिक्षकवृंद व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.

अर्थतज्ज्ञ डॉ.अभय टिळक म्हणाले, कुटुंब आणि समाज यांना जोडणारा सेतू म्हणजे शाळा आहे. आजकाल कुटुंबे लहान झाली. आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असल्यामुळे मुलांनी अनुकरण करावे असे त्यांच्यासमोर काहीही नसते म्हणूनच मुलांना वेळ द्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले. एक सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयोगशील कार्य अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमार्फत चालविले जाते, याचे त्यांनी कौतुक केले.

Pune : लोकशाही सबलीकरणासाठी तरुणांना राज्यघटनेचे ज्ञान आवश्यक – व्हॉईस ॲडमिरल देशपांडे

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट करत (Dehugaon News) शिस्तीचे प्रदर्शन केले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी झेंडागीत सादर केले. तसेच दुसरीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर वंदे मातरम् आणि ‘जय हो’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. तिसरीतील गाथा चरपे हिने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरीराचा व मनाचाही समतोल साधत इ. पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी स्केटिंग व जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिके व पिरॅमिड सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

वर्षभर शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. दिवाळी मेळा मध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या पालकांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. प्राचार्या डॉ.कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका मिनल धुमाळ व वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरेखा काटोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.