Dehugaon News : कोरोनामुक्तांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घ्यावा : डॉ. किशोर यादव

प्लाझ्मा थेरपी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महत्वाचा पर्याय आहे.

एमपीसीन्यूज : प्लाझ्मा थेरपी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महत्वाचा पर्याय आहे. परंतु, दुर्दैवाने अशा दात्यांची संख्या खूप कमी आणि गरजू रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.

इतर औषधांना प्रतिसाद ना देणारे तसेच ज्यांना ऑक्सिजनची गरज अधिक असते, अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धत वापरली जात आहे. मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायी ठरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोरोना आजारातून बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान ठरू शकते.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर ज्या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे त्यांनी अन्य रुग्णांना जीवदान मिळवून देण्यासाठी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन डॉ. यादव यांनी केले आहे.

इच्छुक दात्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSetdzJ8gYPJcPGXDsx51ofxGplvbw0JnYw2xdHQPlXcN6DS9g/viewform या लिंकवर नाव नोंदणी करावी.

त्याचबरोबर https://chat.whatsapp.com/DfqC1BpFQ1mGRvnXIf0wrJ या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.