Dehugaon News : संत तुकाराम महाराज मंदिरासमोर ‘ढोल वाजवा मंदिर उघडा’ आंदोलन

एमपीसीन्यूज : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल श्री क्षेत्र देहूगाव प्रखंड यांच्यावतीने वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर समोर ‘ढोल वाजवा मंदिर उघडा ‘ आंदोलन करण्यात आले. या वेळी ढोल शंख वाजवून, भजन करुन सरकारचा निषेध करण्यात आला.

आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तसेच प्रत्येकाने मास्क लावले होते. राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांच्यावतीने देण्यात आला.

शिवाजी महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, रामनाना मोरे, निखिल पिंजण, ओमकार काळोखे, अमित मोरे, अशोक साकोरे, संदेश भेगडे, अमित भेगडे, अजित काळोखे, शिरीष मोरे, मुकेश पाठक, दीपक अग्रवाल, मयुर हिंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III