Dehugaon News : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत देहूगावात रविवारी ‘खेळ रंगला पैठणीचा’

एमपीसीन्यूज : देहूगावातील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून देहूगाव येथे रविवारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि खेळ रंगला पठणीचा, न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘महाराणी येसूबाई’ ची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल काळोखे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार आहे.  रविवारी सायंकाळी सहा वाजता देहू-आळंदी रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील राजमुद्रा निवास या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

स्पर्धेत सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला पैठणी आणि कोल्हापुरी साज बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर द्वितीय क्रमांकास पैठणी, तृतीय क्रमांकास मिक्सर आणि चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या महिला स्पर्धकास टेबल फॅन देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येईल. यामध्ये दोन महिलांना चांदीचा छल्ला भेट देण्यात येणार असल्याचे काळोखे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका रसिका काळोखे म्हणाल्या, देहूगावातील महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतील महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभनेत्री अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्थानिक महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.