Dehugaon News : श्री राम मंदिर निर्माणासाठी माजी पंचायत समिती सदस्यांकडून लाखाचा निधी

एमपीसीन्यूज : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे यांच्या वतीने एक लाख एक हजार एकशे अकरा (1, 01,111) रुपयांचा विशेष निधी देण्यात आला.

विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र,गोवा,गुजरात क्षेत्र संघटनमंत्री श्रीरंग राजे, पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प शिवाजी महाराज मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे यांच्याकडे या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही देणग्या संकलित करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातही श्री राम मंदिरासाठी विविध स्तरातून देण्यग्यांचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये श्री क्षेत्र देहूमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे यांनीही या कार्यात आपली देणगी दिली आहे. त्यांनी श्री राम मंदिरासाठी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश दिला आहे. याबद्दल देहू आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आणि मान्यवरांनी काळोखे यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.