Dehugaon News: कोरोना लसीकरणाला प्रतिसाद; लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (पीएचसी) बुधवार (दि.10) पासून ‘कोविशिल्ड’ कोरोना लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पाच दिवसात 324 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली. लसीकरणासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कोविशिल्ड लस’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवसेनेचे देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे आदी उपस्थित होते.

देहूगाव येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बालेवाडी येथील गिरीश उपाध्याय या 64 वर्षीय वृद्धास प्रथम लस देवून या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी एका दिवसात 128 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर, मागील पाच दिवसात 324 जणांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.