Dehugaon News : ‘इंद्रायणी’त अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल पथकाची धडक कारवाई

एमपीसीन्यूज : तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीपात्रातील वसंत बंधाऱ्याजवळ वाळू उपसा करणाऱ्यांवर अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार गीता गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाने गुरूवारी ( दि.25 ) पहाटे चारच्या सुमारास कारवाई केली. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, अंकुश आटोळे, उन्मेष मुळे, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील सुभाष चव्हाण, चंद्रसेन टिळेकर, कोतवाल संभाजी मुसूडगे आदींनी करीत सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

देहूतील इंद्रायणी नदीपात्रामध्ये वसंत बंधाऱ्याजवळ वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने गुरूवारी ( दि.25 ) पहाटे चारच्या सुमारास धडक कारवाई केली.

यावेळी घटनास्थळावरून 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह 2 वाळूच्या चाळण्या, 1 फॉकलँड मशीन जप्त करण्यात आले. दरम्यान कारवाईची माहिती मिळताच ट्रॅक्टर व फॉकलँड चालक आणि मजूर वाहने सोडून पळून गेले.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.