Dehugaon News : बसमध्ये चढताना महिलेचे दिड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – देहुगाव येथे निगडीच्या बसमध्ये चढत असताना महिलेचे दिड तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी (Dehugaon News ) हिसकावले. ही घटना देहुगाव बस स्टॉप येथे गुरुवारी (दि.26) दुपारी घडली.

या प्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमात वैष्णवमाता प्राथमिक शाळा सर्वोकृष्ष्ट; 1 कोटींचे बक्षीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या निगडीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे 45 हजार रुपायांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस चोराचा शोध घेत (Dehugaon News ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.