Dehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – देहुगावातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर केला जात आहे. प्लॉस्टिकवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला असून शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_II

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर सरकारने वर्षभरापुर्वी बंदी घातली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. परंतु, भाजीपाला विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा अद्यापही वापर केला जातो.

देहुगावत मंगळवारी आणि शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रारसपणे वापर केला जातो. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.