Dehugaon : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला (Dehugaon) अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास देहूगाव येथील एका टपरीमध्ये करण्यात आली.

संतोष रंगनाथ खरात (वय 43, रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Lonavala : सायंकाळच्या पुणे – लोणावळा लोककलची वेळ बदलावी, पुणे प्रवासी संघाची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थ आरोपी संतोष खरात याने त्याच्या टपरीमध्ये विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार (Dehugaon) पोलिसांनी सप्ला लाऊन कारवाई करत 23 हजार 581 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.