Dehugaon: ग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सिध्देश्वर मंदिर रोडला राडारोड का टाकला? असे विचारत देहूगावच्या ग्रामविकास अधिकार्‍याला एकाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता देहू ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडला.

गणेश वसंत मुसुगडे (रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी अर्जुन मरेप्पा गुडसुरकर (वय-51, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुडसुरकर हे देहूगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सोमवारी सकाळी ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबले होते. तेथे आलेल्या आरोपी मुसुडगे याने गुडसुरकर यांना सिध्देश्वर मंदिर रोडला राडारोड का टाकला? असे विचारत शिवीगाळ करत दमदाटी व धक्काबुक्की केली.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी मुसुगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.