Dehugaon : देहूच्या उपनगराध्यक्षांसह दोन स्विकृत नगरसेवकांचा राजीनामा मंजूर

एमपीसी न्यूज –  काही महिन्यांपूर्वीच आपला राजीनामा गटनेते योगेश परंडवाल यांच्याकडे दिलेल्या देहूच्या उपनगराध्यक्षा शितल हगवणे यांच्यासह स्विकृत नगरसेवक ( Dehugaon ) गणेश शांताराम हगवणे व अक्षदा प्रकाश हगवणे यांचे  राजीनामे  मंजूर करण्यात आले आहेत.

Pimpri : पिंपरी येथे नऊ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

उपनगराध्यक्षा शितल हगवणे यांनी काही महिन्यांपूर्वीच आपला राजीनामा गटनेते योगेश परंडवाल यांच्याकडे दिला होता. मात्र गटनेत्यानी तो नगरध्याक्षांकडे दिला नसल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर दाखल केल्या नंतर अध्यक्षांचा राजीनामा होण्यापूर्वी उपनगराध्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

मात्र ही बाब सांगण्यास संबधितांनी टाळाटाळ केली. 13 नोव्हेंबरला 9 नगरसेवकांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला व त्याच वेळी काही राजकीय तडजोडी झाल्या आणि नगराध्यक्षांसह स्विकृत सदस्यांचे ही राजीनामे झाले. नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर स्विकृत सदस्यांचे राजीनामे झाले व ते मंजूरही झाले आहेत.

त्य़ामुळे नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, व स्विकृत नगरसेवकांची पदे रिक्त आहेत. स्विकृत नगरसेवक पद घेताना एका नगरसेवकाला तीन अपत्य असतानाही नगरसेवकपद अबादीत राखले होते. असे असतानाही सबंधितांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याबद्दल आश्वर्य व्यक्त होत ( Dehugaon ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.