Dehugaon: मासे मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची राज्य सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहू, इंद्रायणी नदीच्या प्रदुषणामुळे हजारो देवमासा आणि खवले मासांच्या मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच पुन्हा मासे मरु नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ प्रस्थान 15 दिवसावर आले असताना प्रशासनाकडून सोहळ्याची लगभग सुरु आहे. श्री क्षेत्र देहुगाव येथील पवित्र इंद्रायणीच्या पात्रात किना-यावर अज्ञात कारणाने रविवार (दि.9) हजारो मृत मासे आढळले. इंद्रयणी नदीमध्ये मागील तीन दशकांतील ही तिसरी मोठी घटना आहे.

  • इंद्रायणी नदीच्या काठावरील गावांचे व देहूगाव परिसरातील गावांचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जाते. तसेच इंद्रायणीत जलपर्णी वाढत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गेल्या दोन वर्षापासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार झाला आहे. मलनि:सारण वाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र, हा प्रकल्प वेळेत पुर्ण झाला असता तर, या माशांचा जीव निश्चित वाचला असता.

शहरातील इंद्रायणी व पवना नदी पात्रात रसायन मिश्रीत दुषित पाणी, वेगवेगळे केमिकल युक्त पाणी, सांडपाणी, वाढती जलपर्णी, शेवाळ यामुळे या नद्या ‘गटारगंगा’ होत आहे. इंद्रायणी व पवनेचे पाणी याच कारणाने दुषीत होत आहे.

  • दुषीत झालेल्या पाण्यातील ऑक्सिजन (प्राणवायू) संपुष्ठात आल्याने माशांचा मृत्यु होतोय. त्यामुळे आपण स्वत: वेळ काढून जातीने लक्ष घालून इंद्रायणी, पवना नद्यांच्या उगमापासून शहरापर्यंत तज्ज्ञांकडून तपासणी करुन घेऊन या नद्या प्रदुषीत होऊ नये. यासाठी उपाययोजना राबवाव्यात. दोषी असणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.