Dehugaon : इंद्रायणी नदीत आढळला पोत्यात बांधून फेकलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – एका अनोळखी व्यक्तीचे हातपाय बांधून, त्याला पोत्यात घालून, पोत्यात दगड टाकून मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी (दि. 18) दुपारी देहूगाव येथे मुख्य मंदिराच्या मागील बाजूला उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील मुख्य मंदिराच्या मागील बाजूला एक मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोत्यात अंदाजे 35 वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह होता. त्याचे हातपाय बांधलेले होते. तसेच पोत्यात एक दगड देखील असल्याचे दिसून आले.

मयत व्यक्तीने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. त्याच्याजवळ एक मोबाईल चार्जर, तेलाची पुडी देखील सापडली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.