Dehugaon: ‘फार्महाऊस’मध्ये चोरी; चोरटयांनी घड्याळ पळविले

एमपीसी न्यूज – फार्महाऊसचे कुलूप तोडून आतील दहा हजाराची रोकड आणि घड्याळ असा 12 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ही घटना देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी अजय शिवाजी काळोखे (वय 26, रा. बोडकेवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फार्महाऊसचा रखवालदार मच्छिंद्र शिंदे याला शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास फार्महाऊसचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मालक मामंचण आगरवाल यांना फोन करून कळविला.

  • आगरवाल यांनी काळोखे यांच्याशी संपर्क साधून तपासणी करण्यास सांगितले. त्यावेळी फार्महाऊसमधील कपाटातील 10 हजाराची रोकड आणि घड्याळ असा 12 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे निष्पन्न झाले. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.