Dehugaon : देहूगाव बसस्थानकावर दोन महिलांचे 1 लाख रुपयांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – देहूगाव बसस्थानकावर (Dehugaon) पीएमपी बसमध्ये चढत असणाऱ्या दोन महिलाचे 1 लाख 20 हजार रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहे. हि घटना रविवारी (दि.29) घडली.
याप्रकऱणी 61 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी 61 वर्षीय वृद्ध महिला देहूगाव बस स्थानकावरून आळंदीकडे जात होती. वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे आणि आणखी एक सोबत प्रवास कऱणाऱ्या महिलेचे दोन तोळ्याचे एकूण चार तोळे वजनाचे 1 लाख 20 हजार रुपयांचे मंगळसूत्र बसमध्ये (Dehugaon) चढत असताना चोरट्यांनी चोरून नेले.
Pune News : लोकजीवनातील भीती गांधी मार्गाने दूर करण्याची गरज : अरुण खोरे
देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.