Dehugaon : विद्यार्थ्यांना शिक्षा करताना ती शिक्षणाशी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी पूरक ठरावी – ॲड. सीमा तरस

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना शिक्षा करताना ती शिक्षा शिक्षणाशी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी पूरक ठरावी (Dehugaon) असे मत शिवव्याख्यात्या ॲड. सीमा तरस यांनी व्यक्त केले.

Pimpri Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणेशोत्सवानिमित्त (Dehugaon) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.  छत्रपती शिवरायांना घडविण्यात जिजाऊ आऊसाहेबांचे फार मोठे योगदान आहे.

आऊसाहेबांनी बाल शिवबांवर त्यावेळी योग्य सुसंस्कारांची पेरणी केली, म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. स्वराज्यनिर्मितीसाठी सर्वात मोठा विरोध हा स्वकीयांकडून झाला. परंतू आऊसाहेबांच्या संस्कारांच्या मुशीने या विरोधालाही स्वराज्याच्या कामी लावण्याचे कसब होते.

विद्यार्थ्यांनाही शिक्षा करताना त्या त्यांच्या आयुष्यातील प्रगतीला पूरक ठरल्या पाहिजे आणि विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेशी आजीवन जोडला गेला पाहिजे असेही ॲड. तरस म्हणाल्या.

सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्या शैलजा स्वामी तसेच इतर शिक्षक वर्गही उपस्थित होता. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी आभार (Dehugaon) व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.