Dehugaon : खोल विहिरीत पडलेल्या उद मांजरास वन्य जीवरक्षकाकडून जीवदान

एमपीसी न्यूज – देहू गाव परिसरात गणेश गाडे यांच्या शेतालगत असलेल्या खोल विहिरीत पडलेल्या उद मांजरास वन्य जीवरक्षकाकडून जीवदान देण्यात आले. 

खाण्याच्या शोधत असताना उद मांजर खोल विहिरीत पडले होते. त्या ठिकाणी तात्काळ वन्य जीवरक्षक मावळ संस्थेचे सूरज शिंदे, नयन कदम, निनाद काकडे आणि मयूर दाभाडे हे दाखल झाले आणि त्यांनी मोठ्या शिताफीने त्यास विहिरी बाहेर काढून मांजराचा जीव वाचवला.

  • त्याला वाचवण्यासाठी हे दोघेजण क्रेनच्या साह्याने सुमारे पन्नास फुट खोल विहिरीत उतरले. त्यास तात्काळ उपचार करून वनविभागाच्या ताब्यात देऊन जंगलात सोडून देण्यात आले. ह्या मांजराची बाजारपेठेत खूप मोठया प्रमाणावर तस्करी होते, अशी माहिती प्राणीमित्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.