Dehugaon : गणेश विसर्जन करताना इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- गणेशमूर्तीचे विसर्जन करताना इंद्रायणी नदीत बुडून एका 19 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना आज देहूगावात घडली.

संदीप साळुंखे असे या तरुणाचे नाव आहे. तरुण बुडाल्याची माहिती कळताच त्वरित एनडीआरएफच्या जवानांनी त्याचा शोध घेण्याचे काम सुरु केले. तब्बल तीन तासानंतर त्याला शोधण्यात जवानांना यश आले. पाण्यातून बाहेर काढला त्यावेळी तो जिवंत होता. त्याला त्वरित पिंपरीच्या आयसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र दुर्दैवाने उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गणेशमूर्ती विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.