Dehugaon: वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांचा राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मान

Medical Officer Dr. Kishor Yadav honored with Rajarshi Shahu Maharaj Award

एमपीसी न्यूज – गतवर्षी सांगली-कोल्हापूर या पुरग्रस्त भागात आरोग्य सेवा देणारे देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांचा राजर्षी शाहू महाराज सोशल फांऊडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात डॉ. यादव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख, धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, अँटी करप्शनच्या अतिरिक्त अधीक्षक  सुषमा चव्हाण,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील-गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. यादव याच्यासह एन.आय.व्ही चे प्रभारी, शास्त्रज्ञ उपसंचालक डॉ. शैलेश पवार, अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, नर्स सविता निगडे यांचा राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे.  कार्यक्रमाचे संयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, सचिव प्रशांत धुमाळ, सदस्य मंदार बहिरट यांनी केले.

डॉ. किशोर यादव म्हणाले, माझे आदर्श असलेले छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळेल, मानाची शाहू पगडी आपल्याला डोक्यावर चढवता येईन, याचा कधी विचार केला नव्हता. शाहू महाराजांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा सन्मान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.