Dehuraod : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्णवाढ सुरूच ; आज नवीन 11 कोरोनाबाधितांची नोंद

Cantonment areas continues to grow; Record of 11 new coronaviruses today : सलग तीन दिवसांपासून वाढताहेत रुग्ण

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, थॉमस कॉलनी, पारशी चाळ, चिंचोली, एलोरा सोसायटी या भागात आज, शनिवारी एकूण 11 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 140 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.  दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रुग्णवाढ कायम आल्याचे दिसून येते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 11नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

तर कोरोनातून बरे झालेल्या 16 जणांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत हद्दीत एकूण 140 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 21 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 20 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 35, तर किवळे येथील सिम्बॉयसिस कोविड सेंटर येथे एक रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 59 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आजपर्यंत फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.