Dehuraod : आज तब्बल 35 नवीन रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 593 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. : Today, 35 new patients have been added; Death of one

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीतील मेन बाजार, किन्हई, थॉमस कॉलनी, आंबेडकर नगर, मामुर्डी, संकल्प नगरी, चिंचोली, धनश्री निवास (उदयगिरी ), श्रीविहार, अलकापुरी, पारशी चाळ या भागात आज, शुक्रवारी 35 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  दरम्यान, आज  एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 593 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 35नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 593 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 37 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर तीन रुग्णांना देहूगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

117 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आज शीतलानगर क्रमांक १ येथील ६९ वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 30 रुग्ण उपचार घेत आहे. आज, 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 390 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 16 इतकी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.