Dehuroad : देहूरोडमध्ये दोन मेडिकल दुकाने फोडली

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे चार जणांनी मिळून दोन मेडिकल दुकाने फोडली. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटे दीडच्या सुमारास स्वामी चौक, देहूरोड येथे घडली.

सागर सुरेश गोयल (वय 34, रा. मामुर्डी गाव, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशील पिल्ले, गण्या, विकी, एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी चौक, देहूरोड येथे फिर्यादी यांचे सागर मेडिकल दुकान आहे. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या मेडीकल दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच देहूरोड मधील मेन बाजार येथे असलेल्या नवशा मेडिकल शॉप मध्येही आरोपींनी चोरी करून 13 हजार रुपये नेले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

सध्या संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना चोरटे राजरोसपणे फिरून दुकाने फोडत आहेत. दुकानदारांना आपल्या दुकानाकडे जाता येत नाही, मात्र चोरटे दुकानांवर हात साफ करून जात असल्याने दुकांदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.