Dehuroad : अवैधरीत्या मद्य बाळगणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अवैधरित्या मद्य बाळगणाऱ्या दोन जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दारू, बियरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण 86 हजार 931 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मनजीत रणजीत विश्वास (वय 24, रा पूना गेट हॉटेल, जुना पुणे मुंबई महामार्ग. मूळ रा. पश्चिम बंगाल), सुरज श्रीधर शेट्टी (वय 29, रा. पूना गेट हॉटेल, जुना पुणे-मुंबई महामार्ग. मूळ रा. मेंगलोर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल पूना गेटच्या मागे दत्तनगर येथे दोघेजण अवैधरित्या मद्य बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारू, बिअरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण 86 हजार 931 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींवर देहूरोड पोलीस ठाण्यात मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.