Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 27 नवीन रुग्णांची नोंद; 14 रुग्णांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

किन्हईतील एका जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. : 27 new patients registered in cantonment today; Discharge of 14 patients, death of one

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीतील बरलोटानगर (मोहित बिल्डिंग ), शेलारवाडी, आंबेडकरनगर (अशोक टॉकीज कंपाऊंड ), किन्हई, शितलानगर नं. 1, मेन बाजार (शुभश्री हॉस्पिटल जवळ व मुंबई पुणे रोड लगत ), शिवाजीनगर आणि श्रीविहार या भागात आज, मंगळवारी 27 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  आज, 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर किन्हईतील एका जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 649 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 27 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 649 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 34 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 37 रुग्णांना, तर एका रुग्णाला तळेगाव दाभाडे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

99 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 461 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर हद्दीतील किन्हई या गावातील 72 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 17 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.