Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी आमदार शेळके यांच्याकडून औषधे व वैद्यकीय साहित्य

एमपीसी न्यूज : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या आमदार निधीतून देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड आणि देहूरोड पोलीस ठाण्यासाठी औषधे आणि वैद्यकीय साहित्य दिले. ही सर्व मदत आज ( सोमवारी) कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

या मध्ये सोडिअम हायपोक्लोराईड, थरमल गण, एन-९५ मास्क , पीपीइ किट, हॅन्ड सॅनिटायझर, ट्रिपल लेअर मास्क आणि व्हीटीएम किट आदी साहित्याचा समावेश होता. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड कार्यालयात सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, नगरसेवक हजीमलंग मारीमुत्तु , ऍड.अरुणा पिंजण, गोपाळ तंतरपाळे, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कृष्णा दाभोळे, ऍड. प्रवीण झेंडे , शिवसेना देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब काळोखे, मुकेश फाले, सचिन पिंजण, संजय बाविस्कर, विकी जाधव,  वैभव नाईक आदी  उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके रात्रंदिवस मेहनत घेत आहे. आजपर्यंत त्यांनी संपूर्ण तालुक्यात आवश्यक त्या सर्व उपाय योजना राबविल्या आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण मावळातील गोरगरीब, मजूर, बेघर नागरिक, स्थलांतरित अशा गरजवंतांना शिधा किटचे वाटप केले आहे.

आमदार शेळके यांच्या आमदार निधीतून संपूर्ण तालुक्यासाठी  एकूण 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  त्यातून आज देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहूरोड पोलीस ठाण्यासाठी औषधे आणि वैद्यकीय साहित्य  देण्यात आले.

आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यापासून ते अन्नधान्य पुरवठा करण्यापर्यंत सर्व ती मदतकरून कोरोनासारख्या महामारीच्या संकटाविरुद्ध लढण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केले. तसेच मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , सर्व पोलीस ठाणे यांनाही आपल्या आमदार निधीतून औषध व पूरक साहित्याचे वाटप केले.

साहित्य वाटप करण्याचे सर्व नियोजन आमदार सुनील शेळके यांचे खंदे समर्थक अतुल मराठे आणि  कार्यकर्ते करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.