Dehuroad : कोरोनाचे आज नवे 8 रुग्ण; दोघा जेष्ठांचा मृत्यू

8 new corona patients today; Death of two elders : आजपर्यंत हद्दीत एकूण 279 पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील थॉमस कॉलनी, आंबेडकरनगर, मामुर्डी, मेन बाजार (लांगे गल्ली, देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ ), गांधीनगर या परिसरात आज, बुधवारी एकूण 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, चिंचोली येथील एका पुरुषासह (वय- 99 ) आंबेडकरनगर महिलेचा (वय-75) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 279 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 8 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसर जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 279 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 35 रुग्ण रुग्णालयात दाखल आहे.

113 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 40 रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

चिंचोली येथील एका पुरुषासह (वय- 99 ) आंबेडकरनगर महिलेचा (वय -75) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 9 झाली आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 82 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.