Dehuroad : दोन चोरट्यांकडून 9 दुचाकी जप्त; देहूरोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलासह दोन चोरट्यांकडून नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली. या कारवाईमुळे देहूरोड, हिंजवडी, निगडी आणि राजगड पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

सनी उमेश पै (रा. सांगवडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक प्रशांत पवार, पोलीस शिपाई किशोर परदेशी यांना माहिती मिळाली की, आरोपी सनी हा दुचाकी चोर आहे. त्याने काही दुचाकी चोरल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याचा तपास करत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सहा दुचाकी चोरल्याचे सांगितले. या दुचाकी देहूरोड आणि हिंजवडी परिसरातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर देहूरोड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन, हिंजवडी, निगडी आणि राजगड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, मयूर जगदाळे, प्रमोद ऊगले, सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमित मोरे, संकेत घारे, विकी खोमणे यांच्या पथकाने केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like