Dehuroad Crime News : किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; आरोपी अटकेत

ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झेंडेमळा, देहूगाव येथे घडली. : A bottle of beer smashed into a young man's head for a trivial reason; Accused arrested

एमपीसी न्यूज – धक्का दिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणा-यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झेंडेमळा, देहूगाव येथे घडली.

शुभम दिलीप परंडवाल (रा. माळवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्वप्नील विलास बाणेकर (वय 25, रा. माळवाडी, देहूगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांना काहीही कारण नसताना धक्का दिला. ‘धक्का का दिला’, असा जाब फिर्यादी यांनी आरोपीला विचारला.

यावरून आरोपीने फिर्यादी स्वप्नील यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारून त्यांना जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.