Dehuroad:  वेळेत फ्लॅटचा ताबा ग्राहकाला न देणार्‍या ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – करारनाम्यानुसार ग्राहकाला ठरलेल्या सोई-सुविधा दिल्या नाहीत, गृहरचना संस्थेची नोंदणी केली नाही, ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने (बिल्डर) बांधकाम व्यावसायिकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मेसर्स श्री. साई इस्टेटचे भागीदार, सुमित दिनदयाल आगरवाल, सचिन दिनदयाल अग्रवाल, सागर ओमप्रकाश आगरवाल, मनोज ओमप्रकाश आगरवाल, संजय सत्पाल आगरवाल, नितीन सुरेंद्र आगरवाल, सचिन ओमप्रकाश आगरवाल, संदिप दिनदयाल आगरवाल (सर्व रा. रावेत) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शाहुराज रामराव टमके (वय 33, रा. साई प्लॅटीना, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टमके यांनी आरोपी यांच्या श्री साई इस्टेट या बांधकाम साईटवर 610 चौरस फुटांचा फ्लॅट बुक केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना ठरलेल्या वेळेत फ्लॅट ताब्यात दिला नाही. करारनामा केला नाही. गृहरचना संस्थेची नोंदणी केली नाही.

तसेच सदनिधारकांची परवानगी न घेता प्रकल्पाचे आराखडे बदलले. करारनाम्यानुसार सुविधा दिल्या नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.