BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : हॉटेलमधील बिअर संपल्याचे सांगणार्‍या व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – ग्राहकाने मागितलेल्या कंपनीची बिअर संपली असल्याचे सांगणाऱ्या व्यवस्थापकाला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी साडे पाचच्या सुमारास चेसु मेस्ट्रो हॉटेल येथे घडली.

जैद जावेद मेमन (वय 22, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोन्याचा जाधव आणि त्याचे चार साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी दुपारी चेसु मेस्ट्रो हॉटेल येथे बियर पिण्यासाठी गेले. आरोपींनी किंगफिशर बियर मागवली. मात्र, हॉटेलमधील किंगफिशर बियर संपल्याचे हॉटेल व्यवस्थापक मेमन यांनी आरोपींना सांगितले. तसेच दुसरी बियर देऊ का? असे म्हणत असताना आरोपींनी मेमन यांना मारहाण केली.

हॉटेलमधील कामगार अंकित ही भांडणे सोडविण्यासाठी आला असता, त्यालाहि देखील आरोपींनी मारहाण केली. घटनेनंतर आरोपी हॉटेलमधून पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3