Dehuroad : भांडणाचा जाब विचारणा-या एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडेनऊच्या सुमारास गांधीनगर, देहूरोड येथे घडली.

अकबर महेबूब शेख (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाकीर ईदायत (रा. शितळानगर, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये आरोपीने फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ केली. शिवीगाळ कारण्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता ‘तू आमच्या भांडणात का आलास?’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.