Dehuroad : दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – सकाळी दूध आणण्यासाठी मोपेड दुचाकीवरुन गेलेल्या व्यक्तीला कारने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गाथा मंदिराकडून देहूगाव कमानीकडे येणा-या रस्त्यावर घडली.

चोखुराम सोनवणे (रा. देहूगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साधना चोखुराम सोनवणे (वय 50) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 12 / पी क्यू 0183 वरील कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास चोखुराम त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / ई झेड 9370) दूध आणण्यासाठी जात होते. गाथा मंदिराकडून देहूगाव कमानीकडे येणा-या रस्त्यावर एमएच 12/ पीक्यू 0183 या कारवरील चालकाने भरधाव वेगात येऊन चोखुराम यांना धडक दिली. या धडकेत चोखुराम गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.