Dehuroad : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना 19 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

भगवान हनुमंत गजरे (वय 48, रा. बापदेवनगर, देहूरोड), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अविंदा भगवान गजरे (वय 34) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव चॅटर्जी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मयत भगवान हे देहूरोड येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी गौरव याने त्याच्या ताब्यातील एमएच 12 / एमआर 0518 ही कार भरधाव वेगात चालवून भगवान यांना धडक दिली. यामध्ये भगवान यांच्या डोक्याला, तोंडाला, हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.